Wednesday, January 9, 2013


किती क्षणांची सोबत अपुली, किती क्षणांचे हिंदोळे.. तुझ्या मनाची सांजसाउली,, दारी पुन्हा घुटमळे ..... सरल्या भिंती, सरली माया.. सरले गुज ते अपुले.... आठवांनी तरी हृदयी सूर पुन्हा का घुमले....? नाही उरले घरटे परी अन पक्षांची किलबिल ही.. पदराच्या त्या उबेत मग ही आसवे का ओघळली? पुन्हा हसावे अन रुसावे,,, तुझ्याच मिठीत उमलावे.. किती वाटले जरी मला हे, तरी का ते बिलगावे? सत्य म्हणुनी जे अवतरते, तेच तेच जगावे.... मग कशाला शिशिर होऊनी पुन्हा पुन्हा उगवावे....? Tuzi minu....

Sunday, January 6, 2013


किती क्षणांची सोबत अपुली, किती क्षणांचे हिंदोळे.. तुझ्या मनाची सांजसाउली,, दारी पुन्हा घुटमळे ..... मिनल..

Wednesday, June 13, 2012

साथ तुझी होती म्हणून इथवर चालले. सोबत नेहमी दिलीस, म्हणून तर बहरले..... ... सुख म्हणजे काय असतं, ते तू दाखवलस. समाधान म्हणजे काय तेही तूच शिकवलस .. तसे माझे लाडहि तू नेहमीच पुरवलेस तसे माझे हट्टही ना कधी तुडवलेस.... तशी माझी ओंजळहि रिकामीच राहिलेली.. तू तुझी सायली त्यात अलगद वाहिलीस... परमेश्वराशी ओळखही तू नव्याने करून दिलीस.. आणि जीवनातलं अध्यात्मही पुन पुन्हा जोडून दिलस...... आनंद आणि स्थैर्य तुझ्यामुळेच अनुभवल .... प्रगतीचा अक्षरही तुझ्यामुळेच गिरवल....

Tuesday, May 17, 2011

साथ तुझी होती
म्हणून इथवर चालले....
हात तुझा हातात
म्हणून क्षितिजापार निघाले...!!!
....मिनल सातोस्करEdit

Monday, April 25, 2011

तू नि तूच

तुला पाहिलं,
नि पुन्हा प्रेमात पडले....
तुला वाचलं,,
नि शब्दात हरवले....

चाहूल तुझी,
चैत्राच्या पालवीत....
आभास तुझा
मध्यान्हीच्या साउलीत ..

संध्याकाळचा यमन
म्हणजे तुझी आठवण..
सुरांची सोबत
म्हणजे तुझी साठवण.....
.

Thursday, April 21, 2011

भेट

तुझी माझी भेट
अशी अवचित कधी घडली.....
मनांत नसतानाही..
काळजास कशी भिडली.....
पाहताच तुला,
पटली एक जुनी ओळख
मनाच्या कोपर्यातला
उजळून गेला काळोख.......

Wednesday, April 6, 2011

प्राजक्त

ओंजळीतला प्राजक्त,
नि त्याचा दरवळ
कधी निसटून गेला
कळलंच नाही..!!!
आज पुन्हा आठवला
आणि मन धस्स झाले
पुन्हा त्याच्या शोधात
रानभर विस्कटले..!!!
ओळखीच्या वाटा धुंडाळल्या,
ठेवणीतले जग हि ओरबाडले,
पण कुठेच त्याचा साधा
मागमूसही नव्हता..!!!
सहज मागे वळून पाहिले,
तर तो तिच्या हातात...
सुखद क्षण होता तो
कारण ते हात होते माझ्या लेकीचे...!!!